काही तासात खुनातील आरोपी पोलिसांनी पकडले

 

भुसावळ,  प्रतिनिधी । येथील एका तरुणाला चाकूने भोसकून ठार मारणाऱ्या ३ आरोपींना पोलिसांनी खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर सापळा रचून काही तासांतच अटक केली .

बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुरनं. 836/2020 भादवि कलम-302,143,144,147, 148,149 नुसार हा गुन्हा 14.सप्टेंबररोजी दाखल करण्यात आला. फिर्यादी शेख राशीद शेख मासुम ( वय-44,रा. जाममोहल्ला) यांचा मुलगा अल्तमश शेख ( वय-21) याला जुन्या भांडणाच्या कारणावरून आरोपी समीर शेख,शाहरुख शेख, आमिर शेख, रमजान शेख व आदर्श गायकवाड यांनी आधी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली होती या हल्ल्यात नंतर आरोपी समिर शेख यांने त्याचे हातातील लोखंडी चाकुने अल्तमश शेख यास छातीत ,पोटात,पाठीवर भोसकुन ठार मारले होते . हा गुन्हा काल रात्री ९. ३० वाजेच्या सुमारास घडला होता .

उपविभागिय पोलीस अधिकारी गजाजन राठोड यांना मिळालेल्या गुप्त बातमीमार्फत आरोपी शेख समिर युसुफ, शेख शाहरुख शेख युसुफ ( दोन्ही रा.10 खोली रिंगरोड,) समिर शेख रेहमान शेख (रा,15 बंगला ) हे शहरातुन पळुन जात असतांता त्यांना दिनांक. 14.सप्टेंबर रोजी पहाटे 5. वाजेच्या सुमारास सुन्दरनगर भागातुन सापळा रचुन ताब्यात घेण्यात आले अन्य फरार आरोपीचा पोलीस कसुन शोध घेत आहेत. पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले , अपर पोलीस अधिक्षक श्रीमती भाग्यश्री नवटके ,.उपविभागिय पोलीस अधिकारी गजानन राठोड , पोलीस निरीक्षक दिलीप भागवत , बाबासाहेब ढोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक अनिल मोरे, मंगेश गोटला ,पोना रविंद्र बि-हाडे, रमन सुरळकर, उमाकांत पाटील, किशोर महाजन , समाधान पाटील, पोकॉ विकास सातदिवे, प्रशांत परदेशी, ईश्वर भालेराव, योगेश महाजन, श्रीकृष्ण देशमुख, गजानन वाघ यांनी ही कामगिरी यशस्वी केली

Protected Content