कासोद्यात प्रजासत्ताक चषक क्रिकेट स्पर्धा उत्साहात

kasoda news

कासोदा प्रतिनिधी – एरंडोल येथील युवा शक्तीतर्फे वकील, डॉक्टर शिक्षक प्राध्यापक पत्रकार सर्वशासकीय कर्मचाऱ्यांच्या क्रिकेट स्पर्धा घेण्यात आल्या. त्यास्पर्धेत ग्रामीण रुग्णालय कासोदा संघाने प्रथम क्रमांक पटकाविला. तर ग्रामीण रुग्णालय एरंडोल संघ उपविजेता ठरला.

आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये तिसरा क्रमांक शिक्षण विभाग एरंडोल संघाने पटकाविला. स्पर्धेत प्रथम बक्षीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे एरंडोल तालुकाध्यक्ष प्रा. मनोज पाटील सर पहेलवान यांच्या कडून दुसरे बक्षीस एरंडोल पंचायत समितीचे सदस्य शिवसेनेचे नेते विवेक पाटील तर तिसरे बक्षीस प्रा. आर एस पाटील सर यांच्या कडून देण्यात आलें. स्पर्धेत प्रत्येक सामना अटीतटीचा झाला. या वेळेस तालुका आणि शहरातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती दिली. स्पर्धेत पंच म्हणून शशिकांत चौधरी , संदीप लहासे , पद्माकर मराठे , आबा महाजन , पत्रकार वीक्की खोकरे यांनी काम पहिले.

बक्षीस वितरणाच्या कार्यक्रम यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अमित पाटील , प्रा मनोज पाटील , विवेक पाटील , प्रमोद भाऊ चौधरी , प्रा. आर एस पाटील , ईश्वर पाटील सर , जावेद दादा मुजावर , एरंडोल शहराचे उपनगराध्यक्ष बबलु चौधरी पहेलवान, शिक्षक आदर्श शिक्षक पुरस्कृत किशोर पाटील कुंझरकर आदी मान्यवरांचा हस्ते पार पडला. कार्यक्रमाचे सूत्र संचालन आर.एस.पाटील आणि मुख्तार शेख यांनी केले. स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी प्रमोद ठाकूर, आकाश धोबी, शुभम चौधरी, संदीप लहासे, मुख्तार शेख, विनीत मराठे, शन्तनु भेल्सेकर, राहुल महाजन, इमरान शेख आदींनी परिश्रम घेतले. सामन्याचे धावते समालोचन क्रिकेट पटू मुख्तार शेख , हिंदी मराठी इंग्रजी समालोचना वर जबरदस्त पकड असलेले किशोर पाटील कुंझरकर यांनी केले व सालाबादाप्रमाणे सर्वांना खिळवून ठेवले. आयोजकांच्या वतीने शुभम चौधरी यांनी व युवाशक्ती एरंडोल टीम ने सर्वांचे आभार व्यक्त केले.

Protected Content