कासोदा प्रतिनिधी । येथील ग्रामस्थांना सध्या दूषित पाणीपुरवठा होत आहे. म्हणून रुग्णाच्या संख्येत वाढ होत आहे. गावातील खासगी दवाखान्यात दरदिवसाला ३० रूग्णांची तपासणी होती आहे. साथीच्या आजारांनी डोकेवर काढले आहे. सर्दी खोकला, स्वच्छ (संडास) आणि तापाने जनता त्रस्त झाली आहे.
याबाबत माहिती अशी की, कासोद्यासह १६ गाव पाणीपुरवठा विजबिल थकल्याने महावितरण कंपनीने वीजपुरवठा ४ महिन्यांपासून बंद केला असून एन हिवाळ्यात ही ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. गेल्या २५ वर्ष ही योजना सुरू आहे .गिरणा धरणातून आवर्तनाने दहिगाव बंधारा पाण्याने भरला जातो. मुख्य जलवाहिनी ने अंतुर्ली शिवारात असलेल्या फिल्टर्स प्लांट ने कासोद्यासह जवखेडेसिम, तळई, अंतुर्ली, आडगाव, वनकोठे या गावांना पाणीपुरवठा होत होता.
परंतु शिखर समितीने पाणि पुरवठा विजबिल न भरल्याने महावितरण कंपनीने दहिगाव बंधाऱ्यावरील विज कनेक्शन कट केले आहे. म्हणुन त्या त्या गावातील सरपंच यांनी पाणि पुरवठा व्हावा म्हणून गाव नजिकच्या ग्राम पंचायत हद्दीतील विहिरीतुन गावांना पाणि पुरविण्याचा मानस धरला आहे. परंतु ते पाणी शुद्ध नसल्याने आजारपणाला आमंत्रण दिले जात असल्याचे दिसून येत आहे. एकीकडे शेजारील राष्ट्रात कोरणा व्हायरस मुले लोकांनी भीती बाळगली आहे आणि इकडे नागरिक शुद्ध पाणी नसल्याने हैराण झाले आहे. वैद्यकीय अधिकारी यांनी या कडे लक्ष द्यावे, तसेच प्रशासनाने व स्थानिक लोकप्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष केलेले दिसते.