कासोदा येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त ध्वजारोहण

kasoda

कासोदा (प्रतिनिधी)। येथील साधना माध्यमिक विद्यालय, भारती विद्या मंदिर, जि.प. शाळा.नं. १, जि.प शाळा नं. २ ग्रामपंचायत कासोदा येथे आज 1 मे “महाराष्ट्र दिन” व “कामगार दिवस” मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.

याप्रसंगी साधना माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एम.ए.पाटील, जि.प.प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र मोरे, भरती विद्या मंदिराच्या मुख्याध्यापिका वंदना चौधरी, कासोदा ग्रा.पं. सरपंच मंगलाबाई राक्षे तसेच सर्व शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी, विद्यार्थीनी कर्मचारी वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात शालेय प्रार्थनेने व परिपाठने करण्यात आली. साधना माध्य. विद्यालयाचे मुख्यध्यापक एम.ए.पाटील यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. विद्यालयाचे उपशिक्षिका श्रीमती सी.पी.पवार यांनी विद्यार्थ्यांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाची माहिती साध्या सोप्या सरळ भाषेत सांगितली. उपशिक्षक राम उपरे यांनी विद्यार्थ्यांकडून घोषणा म्हणून घेतल्या. कार्यक्रमाचे सुंदर फलक लेखन कलाशिक्षक, दिपक चौधरी व बावस्कर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार शिक्षक दिपक पवार सर यांनी केले.कार्यक्रमास सर्व विभागाचे शिक्षक विद्यार्थी पालक व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

Add Comment

Protected Content