कासोदा येथील साधना शाळेत निरोप समारंभ उत्साहात

kasoda

कासोदा प्रतिनिधी । येथील ज.जि.म.वि.प्र.सह.संस्थेच्या साधना माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इ.१० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ नुकताच संस्थेचे संचालक एस.आर.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.

कार्यक्रमाची सुरुवात विद्येची देवता सरस्वती मातेच्या प्रतिमेस माल्यार्पण व द्विपप्रज्वलन करून करण्यात आली. याप्रसंगी शाळेतील आदर्श विद्यार्थी म्हणून धिरज रवंदळे (मालखेडे), धनश्री पाटील (फरकांडे), मानसी खैरनार (कासोदा), वसुधा सूर्यवंशी, गायत्री लोहार या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रशस्ती पत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे माजी प्राचार्य सी.जी.पाटील, माजी विद्यार्थी संजय जमादार हे होते. प्रशांत पाटील, प्रभाकर भामरे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बि.जे.बेडसे यांनी केले. तर आभार के.के. पवार यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयाचे सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले. तद्नंतर सर्व विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन आणि त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छाही देण्यात आल्या.

Protected Content