कासोदा येथील विद्यार्थ्यांची जळगावाती वृद्धाश्रमास भेट

kasoda 2

कासोदा प्रतिनिधी । येथील बालविश्व प्रि.प्रा.लिटिल व्हॅली इंग्लिश मीडियम स्कूलच्या विध्यार्थ्यांनी जळगांव येथील मातोश्री वृद्धाश्रम सवखेडे येथे भेट दिली.

सविस्तर असे की, शाळेचे संचालक अशोक पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुख्याध्यापिका सारिका कासार यांनी विद्यार्थ्यांना आपल्या आजी-आजोबांबद्दल आदर असावा व जे आजी-आजोबा आपल्या घरात असूनही नसल्याप्रमाणे असतात तर त्यांच्याबद्दल आदरभाव असावा त्यांच्याबद्दल कृतुज्ञता असावी, यासाठी वृद्धाश्रमात भेट द्यावी या हेतूने लिटिल व्हॅली प्रि.प्रा.स्कूलच्या विधर्थ्यांना भेटीसाठी नेले असल्याचे सांगितले.

त्याप्रसंगी छोटे खाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमात मातोश्री वृद्धाश्रमाच्या संचालिका व व्यवस्थापक काळे सर यांनी वृद्धश्रमात ३० च्या वर आजी आजोबा आहेत व त्याबद्दल व त्यांच्या संस्थेच्या उपक्रमाची माहिती दिली वृद्धाश्रमातील आजी आजोबांना विध्यार्थ्यांनी भिस्किट, फळे व ग्रीटिंग कार्ड भेट दिली. मुलांना पाहून आजी आजोबांचा आनंद गगनात माव्हेल एव्हढा होता. त्याप्रसंगी विध्यार्थ्यांनी स्वागत गीत गाऊन सर्वांची मने जिंकली तर काही विद्यार्थांनी कविता म्हटल्या तर काहींनी डान्स करून दाखवला. आजी आजोबांनी मुलांसोबत आनंदी आनंद लुटला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक भावना शिंदे यांनी केले तर आभार माधुरी चौधरी यांनी मानले. व संचालक यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. कार्यक्रम व वृद्धाश्रमाची भेटघेण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सारिका कासार यांनी अथक परिश्रम घेतले.

Protected Content