संस्कृत फक्त कर्मकांडाची भाषा नव्हे तर ही ज्ञान विज्ञानाची भाषा – प्रो.मुग्धा गाडगीळ

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  मु.जे. महाविद्यालयाच्या संस्कृत विभागाच्या वतीने या वर्षी दि २८ ते ०२ दरम्यान संस्कृत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. या दरम्यान विविध स्पर्धांचे आयोजन ही  करण्यात आले . कार्यक्रमाचे समापन प्रो. मुग्धा गाडगीळ, प्रोफेसर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या व्याख्यानाने झाले.

संस्कृत मधील प्राचीन ज्ञान परंपरा या विषयावर आपले मनोगत मांडताना त्या म्हणाल्या कि, संस्कृत फक्त कर्मकांडाची भाषा नाही तर ती ज्ञान विज्ञानाची भाषा आहे. त्यांनी पीपीटीच्या माध्यमाने प्राचीन भारताचा गौरवमय इतिहास संस्कृती व ज्ञान परंपरा विषयी सखोल असे मार्गदर्शन केले व सोबतच गणित,स्थापत्य व मृग पक्षी शास्त्र विषयी सविस्तर माहिती दिली,सोबतच मुलांनी संस्कृत मध्ये जास्त गुण मिळतात म्हणून संस्कृत घेऊ नये तर संस्कृत सोबत इंग्रजी भाषा शिकून  यात दडलेले ज्ञान आत्मसात करून इतर वैदेशीय भाषा मध्ये अनुवाद करून जगात याची ओळख करून द्यायला हवी. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान प्रो.भूपेंद्र केसुर भाषाप्रशाला प्रमुख यांनी भूषवले.त्यांनी म्हटले कि  जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी संस्कृत भाषेचे सखोल अध्ययन करून जगाला भारतीय ज्ञानची ओळख करून द्यावी. विविध स्पर्धामध्ये प्रथम द्वितीय व तृतीय आलेले विद्यार्थ्यांना या वेळी प्रमाणपत्र व रोख बक्षीस ही देण्यात आले.

कार्यक्रमासाठी विद्यार्थी,पालक व प्राध्यापक वृंद ही मोठ्या संख्येने उपस्थित होते.   मंगलाचरण व स्वागत गीत कु.रसिका ढेपे,चेतना काथार, व सिध्दी उपासनी यांनी म्हटले सूत्र संचलन रसिका ढेपे यांनी केले. विभाग प्रमुख डॉ. भाग्यश्री भलवतकर यांनी प्रास्ताविक केले. डॉ.अखिलेश शर्मा यांनी मुख्यवक्तांचे परिचय व आभार व्यक्त केले. संस्थेचे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे , प्राचार्य स.ना.भारंबे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमासाठी जान्हवी पाटील, दीपिका सोनार, जागृती खैरनार, जया पाटील, बारी गौतमी, जागृती महाजन, उन्नती राठौर, उर्मिला चौधरी, किरण महाराज इत्यादी विद्यार्थ्यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.

Protected Content