कासोदा प्रतिनिधी । येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना संरक्षक भिंत बांधकामचे भूमिपूजन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्याहस्ते करण्यात आले.
सविस्तर असे की जळगांव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे व जिल्हा मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.बी एन पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत व १४ वित्त आयोग योजनेंतर्गत गांवातील तसेच संपुर्ण जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना संरक्षक भिंत बांधकामाचे योजिले असतांना आज ७ मार्च रोजी कासोदा येथील तळई रोडा लगत असलेल्या जिल्हा परिषद उर्दु शाळा नं. २ येथे संरक्षक भिंत्तिच्या भूमीपूजन जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे व मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन. पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. सोहळा तालुक्याचे आमदार चिमणराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
कार्यक्रमाप्रसंगी एरंडोल येथील उपविभागीय अधिकारी विनयजी गोसावी, गट विकास अधिकारी एरंडोल बी.एस.अकलाडे, तहसीलदार अर्चना खेतमाळीस, बालविकास प्रकल्प अधिकारी शैलजा पाटील, जि.प.च्या माजी अध्यक्षा उज्वला पाटील, सरपंच मंगलाबाई राक्षे, ग्राम पंचायत सदस्या अरुणाबाई सोनवणे, जि.प.सदस्य नानभाऊ महाजन, मा. जि.प.उपाध्यक्ष हिम्मतराव पाटील, सरपंच पुत्र भैय्याराक्षे, पं.स. सभापती अनिल महाजन, पत्रकार प्रमोद पाटील, पत्रकार राहुल मराठे, पत्रकार वासुदेव वारे, पत्रकार सागर शेलार, पत्रकार प्रशांत सोनार, पत्रकार निरुद्दीन मुल्लाजी शाळेतील शिक्षक, उर्दु शाळेचे मुख्याध्यापक, विद्यार्थी, कासोदा पोलीस स्टेशनचे कर्मचारी, सर्व पक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, गावातील महिला, ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक पाटील सर यांनी केले, तर प्रास्ताविक गट विकास अधिकारी बी.एस.अकलाडे यांनी केले व आभार नुरुद्दीन एनोद्दिन शेख यांनी मानले.