सावदा,प्रतिनिधी | काश्मिर घाटी मध्ये घडलेल्या हिंदूंच्या नृशंस हत्येचा निषेध करत जिहादींंचा कायमचा बंदोबस्त करावा या मागणीसाठी राष्ट्रपती यांना सावदा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक यांच्या मार्फत विश्व हिंदू परिषद, बजरंग दलातर्फे निवेदन देण्यात आले.

निवेदनाचा आशय असा की, भारताच्या पावन भूमीला रक्तरंजीत करण्याचा प्रयत्न करणाऱ्या , भारतभूमीच्या अखंडत्वाला बाधा पोहचवून तीचे तुकडे करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना कडक शिक्षा करण्यात यावी. भारताच्या एकतेसाठी व अखंडत्वासाठी संपूर्ण देश कृत संकल्प आहे. जिहादी आतंकवादाला जशास तसे उत्तर देणे आम्ही योग्य पद्धतीने जाणतो.बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेचा एक एक कार्यकर्ता यासाठी तत्पर आहे. आतंकवादाचा राजनैतीक हत्यार म्हणून प्रयोग करणाऱ्या जिहादी पाकिस्तान वर अंकुश लावण्याकरिता विश्व समुदायाने पुढे यावे अशी मागणी व आवाहन करण्यात आले. बलीदानी हिंदू व शिख यांच्या परिवारासोबत आम्ही मनःपूर्वक संवेदना प्रगट करत असतांनाच विश्व हिंदू परिषदेचा प्रत्येक कार्यकर्ता व संपूर्ण हिंदू समाज पिडीत परिवारांसोबत उभा असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. यावेळी विश्व हिंदू परिषद जिल्हा मंत्री योगेश भंगाळे, बजरंग दल जिल्हा संयोजक विकी भिडे, जिल्हा सुरक्षा प्रमुख चंदन इंगळे, आकाश झोपे प्रतीक पाटील आदी उपस्थित होते.


