धरणगाव, प्रतिनिधी । धान्य वितरणकरतांना कार्डाधारकांची बायोमेट्रोक पडताळणी न करता रेशन दुकानदाराचे स्वतःचे आधार अधिप्रमाणित करून धान्य वाटपाची सुविधा शासनाने परिपत्रकान्वये दि. 31 जुलै 2020 पर्यंत उपलब्ध करूंन दिली होती ही सुविधा यापुढेही सुरू ठेवण्यात यावी अशी मागणी स्वस्त धान्य दुकानदार संघटनेतर्फे जिल्हा पुरवठा अधिकारी व तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
कार्डधारकांना ई-पॉश मशिनवर बोट-अंगठा लागण्याची आवश्यकता नसल्यामुळे रेशन दुकानातील होणारी गर्दी कमी होवू लागली आहे. तसेच काही कारणास्तव ज्या कार्डधारकांचे बोट-अंगठा प्रमाणित होत नव्हते ते गरीब कार्डधारक धान्यापासून वंचित राहत होते. परंतु, शासनाच्या पत्रानुसार दिलेल्या सुविधामुळे ते कार्डधारकधारकांना देखील धान्य मिळाले. दुकानदारांचा कार्डधारकांचा प्रत्यक्ष संपर्क न असल्यामळे विषाणुचा संसर्ग टाळता आला. सद्यास्थितीत ऋतुनुसार हवामानात वारंवार बदल होत असल्यामुळे काही कार्डधारकांना ताप, सर्दी, खोकला आल्याचे दिसून येते. उपरोक्त ई-पाँश मशिनवर बायोमट्रीक तपासणी करतांना शिंका व खोकला येत असतो. कोरोना विषाणूचा प्रकोप पुर्णपणे नष्ट होत नाही तोपर्यंत शासनाच्या संदर्भाकिय परिपत्रकानुसार कार्डधारकांची बायोमॅट्रीक पडताळणीं न करता रेशन दुकानदारानी स्वत:चे आधार अधिप्रमाणि करून धान्य वाटपाची सुविधा वाढवून देण्यात यावी अशी मागणी केली आहे. निवेदन संघटनेचे अध्यक्ष आर. डी. पाटील,तसेच उपाध्यक्ष सोपान पाटील, अरविंद ओस्त् वाल, मिलिंद पवार, निलेश ओस्त्वाल यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी तसेच तहसिलदार श्री देवरे यांना दिले