कारच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । शहरातील बी.जे.मार्केटजवळ कारच्या झालेल्या धडकेत दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना घडली होती. या संदर्भात अज्ञात कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, किरण भगवान सपकाळे (वय-३२, राहणार कानळदा ता. जि. जळगाव) हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. खाजगी ट्युशन घेऊन तो आपला उदन निर्वाह करतो. २६ मार्च रोजी रात्री १० वाजता किरण सपकाळे हा त्याची दुचाकी (एमएच-१९ डीएम ७६७४) ने नशिराबाद येथे जाण्यासाठी बी.जे. मार्केट येथून जात होता. त्यावेळी दुचाकीवरून जात असताना कार क्रमांक (एमएच १९- ६४५१) दुचाकीला धडक दिली. या धडकेत किरण सपकाळे हे खाली पडले. त्यामध्ये त्यांना डोक्याला हाताला पायाला गंभीर दुखापत झाली. दरम्यान कारचालक हा कार घेऊन पसार झाला होता. उपचार घेतल्यानंतर किरण सपकाळे यांनी शुक्रवार ३१ मार्च रोजी दुपारी १२ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्याने दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात कारचालकाविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ महेंद्र पाटील करीत आहे.

Protected Content