जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील लोकशाहीर सखाराम जोशी प्रतिष्ठान आणि इंडियन रेडक्रॉस सोसायटी रक्तकेंद्राच्या च्या संयुक्त विद्यमाने मंगळवार २६ जुलै रोजी सकाळी ‘कारगिल विजय दिन’ औचित्याने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
रक्तादान शिबीरात एकुण ७५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगावचे डीन डॉ जयप्रकाश रामानंद, लोकशाहीर सखाराम जोशी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संग्राम जोशी, सचिव संदीप जोशी, रेडक्रॉसचे डॉ. प्रसन्न कुमार रेदासनी, कांचन नारखेडे, सुभाष सांखला, गनी मेमन, उज्वला वर्मा आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या आरंभी रक्तदान आवाहन गीत संग्राम व संदीप जोशी यांनी सादर केले. सामाजिक बांधिलकी मानून सैनिकांप्रति कृतज्ञतापूर्वक रक्तदान कार्यक्रम हा स्तुत्य उपक्रम असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मुंढे यांनी उपस्थितांना संबोधन केले. कारगिल युद्धात ज्यांचा प्रत्यक्ष सहभाग होता असे सुभेदार सीताराम पाटील, दिलीप जाधव यांचा सत्कारही डॉ. मुंढे यांच्या हस्ते करण्यात आला.
अतिथी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगावचे डीन डॉ जयप्रकाश रामानंद यांनी देखील सुसंवाद साधला. शिबिरात प्रथम रक्तदान करणारे दाते योगेश चौधरी यांच्या रक्तदान शिबिराचा प्रारंभ झाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोमनाथ महाजन, ह्यानी तर आभार प्रदर्शन संग्राम जोशी यांनी केले. त्रिवेणी माळी यांनी उत्स्फूर्तपणे मनोगत व्यक्त केले. पु.ना. गाडगीळ ज्वेलर्स यांच्या सौजन्याने रक्तदान शिबिर पार पडले. कल्याणकारी उपक्रम गत वर्षी ही करण्यात आला होता. त्याला रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता.