जळगाव : प्रतिनिधी । कायद्याच्या चौकटीत राहून समाजातील अपप्रवृत्ती ठेचण्याची एकी आयएमएमध्ये आहे याचे भान प्रशासन आणि लोकप्रतिनिधींसह समाजातील सर्व घटकांना आणून देऊ , असे प्रतिपादन आज माजी खासदार डॉ उल्हास पाटील यांनी केले .
डॉक्टरांवर होणारे हल्ले रोखणारा कायदा तात्काळ अमलात यावा आणि ऍलोपॅथीवर तर्कशून्य टीका करणारी रामदेवबाबांसारखी प्रवृत्ती पायबंद घालून राखावी यासह अन्य मागण्यांसाठी आज देशभर आयएमएने पुकारलेल्या निषेध आंदोलनानिमित्त जिल्ह्यातील आंदोलनात सहभागी डॉक्टरांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
कोरोना संकटात संभाव्य त्रासाचा अंदाज घेऊन सरकारला दक्षतेच्या सूचना देण्यासह प्रसंगी जीव धोक्यात घालून ऍलोपॅथी च्या डॉक्टरांनी उपचार केले देशभरात कोरोना रुग्णांवर उपचार करताना १५०० डॉक्टरांनी प्राण गमावले काही सुविधांचा अभाव आरोग्य यंत्रणेत असताना आहे त्या परिस्थितीत मार्ग काढण्याची धडपड केली . प्रत्येक डॉक्टर त्याने घेतलेल्या शपथेला अनुसरून रुग्णांसाठी नेहमीच धडपडत असतो त्यामुळे समाजाचे प्रेम डॉक्टरांना मिळते हे हि आपण पाहतो मात्र काही निवडक नालायक वृत्तीचे लोक हे निरामय सेवेचे क्षेत्र दूषित करतानाही आपल्याला समाजात आढळतात त्यांच्या विरोधातच आमचा हा एकिचा संघर्ष आहे डॉक्टरांना संरक्षण देणारा कायदा संसदेने संमत केलेला आहे फक्त गृह मंत्रालयाकडून त्याची अंमलबजावणी होणे बाकी आहे त्यासाठी आणि समाजालाही आमच्या एकीच्या अस्तित्वाची जाणीव करून देण्यासाठी आम्ही आज आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे , असेही ते म्हणाले.
तत्पूर्वी प्रास्ताविक करताना आयएमएचे सचिव डॉ. राधेश्याम चौधरी यांनी सांगितले कि, जिह्यातील प्रत्येक ऍलोपॅथी डॉक्टरचा सक्रिय सहभाग या आंदोलनात पाहिजे आहे . सोशल मीडियावर लाईव्ह करून डॉक्टरांनी हे आंदोलन समाज , लोकप्रतिनिधी आणि प्रशासनापर्यंत पोहचवले पाहिजे. समाजाला आपापली एकी दाखवून आणि वास्तव सांगून त्यांचे जनमत आपल्याला अनुकूल करून घेऊ शकलो कि सरकारला आपल्या भूमिकेची दाखल घ्यावीच लागणार आहे. याप्रसंगी अध्यक्ष डॉ. शिरीष चौधरी, सचिव डॉ. राजेश चौधरी, डॉ. अनिल पाटील, स्नेहल फेगडे, डॉ. राजेश पाटील आणि सदस्य उपस्थित होते. यानंतर डॉक्टरांनी निदर्शने करून जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना मागण्यांचे निवेदन दिले.
भाग १
https://www.facebook.com/508992935887325/videos/500023034619901
भाग २
https://www.facebook.com/508992935887325/videos/493131018438797
भाग ३
https://www.facebook.com/508992935887325/videos/1071086359963889