अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन करण्यासाठी पोलीस प्रशासनातर्फे येथे कॉर्नर सभा घेण्यात आल्या.
नुकत्याच झालेल्या हिंदू-मुस्लिम दंगलीच्या पार्श्वभूमीवरअमळनेरला काल सायंकाळी कसाली डीपी मोहल्ला, माळीवाडा आणि आखाडा मकान भाग येथे वरिष्ठ पोलीस निरिक्षक विजय शिंदे यांनी स्वतः व अधिनस्त अधिकारी अनिल भुसारे व नरसिंह वाघ , विलास पाटील पोना शरद पाटील, दीपक माळी, रविंद्र पाटील, सिद्धांत सिसोदे, योगेश महाजन, कैलास शिंदे, श्रीराम पाटील, अमोल पाटील, चालक मधुकर पाटील यांनी कॉर्नर सभा घेतल्या.
याप्रसंगी विजय शिंदे यांनी दोन्ही समुदायातील तरूणाईशी संवाद साधत त्यांना सलोख्याने वागण्याचे आवाहन केले. सोशल मीडिया वर कोणतेही चुकीचे मॅसेज किंवा व्हिडीओ शेयर अथवा वायरल करु नये, कोणतीही चुकीची घटना होत असल्यास त्याची तात्काळ माहिती पोलीसांना देतील, कोणीही चुकीची अफवा पसरविणार नाहीत बाबत सूचित केले. तसेच सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्याबाबत सूचना दिल्या.