एस.एस. मणियार विधी महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एस.एस. मणियार विधी महाविद्यालयात “हेवन २०२२-२३” चे उद्घाटन शिक्षण शास्त्र महाविद्यालय खिरोदाचे प्राध्यापक डॉ. एस.टी. भुकन यांच्या हस्ते करण्यात आले.

 

यावेळी मंचावर प्राचार्य डॉ. बी. युवाकुमार रेड्डी, डॉ. डी. आर. क्षीरसागर, स्नेहसंमेलन समन्वयक डॉ. रेखा पाहुजा होते. कार्यक्रमास प्रा. जी. व्ही. धुमाळे, डॉ. योगेश महाजन, डॉ. विजेता सिंग, डॉ. अंजली बोंदर, प्रा.बी.एस. पाटील, प्रा. ललिता सपकाळे, प्रा.स्वाती लोखंडे, स्नेहसंमेलन सचिव सरोज पाटील, विद्यार्थिनी प्रतिनिधी डिंपल सुरलकर उपस्थित होते.

 

 

यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. भुकन यांनी विद्यार्थ्यांना सांस्कृतिक उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या तसेच भावी आयुष्यामध्ये वकील म्हणून सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला.

तत्पूर्वी स्नेहसंमेलन समन्वयक डॉ. पाहुजा यांनी प्रास्ताविक केले तर डॉ. रेड्डी यांनी स्वागत पर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी ईशा पिंपळीकर व विधी जोशी यांनी केले. शेवटी स्नेहसंमेलन सचिव सरोज पाटील यांनी मान्यवरांचे आभार मानले. आज दिवसभरात रांगोळी, मेहंदी, वादविवाद स्पर्धा,  गरबा, हिंदी गीत, शिवाजी महाराजांवरील पोवाडा, भीम गीत सादरीकरण करण्यात आले. दिवसभरात परिक्षक म्हणून ॲड. राहुल अकोलकर, ॲड. गणेश सावळे, ॲड. अभिजीत रंधे, ॲड. अर्जुन खैरनार, ॲड. पवन झंवर, ॲड. रोहन सावंत यांनी स्पर्धांचे परीक्षण केले.

Protected Content