कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाविरोधात चाळीसगावात शिवसेनेचे तहसीलसमोर आंदोलन (व्हिडीओ)

चाळीसगाव प्रतिनिधी । केंद्रसरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे शेतकरी वर्गामध्ये संतापाची लाट आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी मागे घ्यावी अशी मागणी करत आज चाळीसगाव येथील तहसील कार्यालयाच्या आवारात शिवसेनातर्फे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली आज आंदोलन करण्यात आले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाने सरकारला दिलेला कांदा निर्यात बंदीचा प्रस्ताव हा करुणा च्या संकटकाळात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना हा धक्कादायक निर्णय आहे. निर्यातबंदीमुळे बाजारातील कांद्याच्या वाढत्या किमती वाढल्या आहेत केंद्र सरकारने केलेली निर्यात बंदी ही शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारी आहे. तरी केंद्र सरकारने हा निर्यात बंदीचा निर्णय तात्काळ मागे घेऊन शेतकर्‍यांना दिलासा द्यावा अशी मागणी चाळीसगाव शिवसेनाच्या वतीने करण्यात आली यावेळी मोदी सरकार विरोधात घोषणा करत आंदोलन करण्यात आले. मोदी सरकार हाय हाय, निर्यात बंदी झालीच पाहिजे अशा घोषणा दिल्या.

महाराष्ट्रातील शेतकरी संघटना आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व कृषिमंत्री दादासाहेब भुसे याबाबत गंभीर असून केंद्र सरकारशी चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहे या खात्याचे मंत्री ना. पियुष गोयल यांच्याकडे कांदा निर्यात बंदी हटवण्याची मागणी चाळीसगाव तालुका शिवसेना करत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कांद्याला भाव मिळत असल्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना चांगला दर मिळत आहे. या निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांना नुकसान होत आहे. चाळीसगाव तालुक्यातील अतिवृष्टीमुळे तसेच अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला असून हवालदिल झाला, तरी यासाठी चाळीसगाव तालुक्यातील शेतकरी पंचनामे होऊन लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी तसेच लवकरात लवकर निर्यात बंदी उठवावी व नुकसानभरपाई शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.

यांची होती उपस्थिती
यावेळी शिवसेना जिल्हा प्रमूख गुलाबराव वाघ, उपजिल्हा प्रमूख रोहिदास पाटील, जिल्हा समन्वयक महेंद्र पाटील, तालुकाप्रमुख रमेश आबा चव्हाण, विधानसभा क्षेत्र प्रमुख भीमराव खलाणे, शहर प्रमुख नानाभाऊ कुमावत, तालुका प्रवक्ता दिलीप घोरपडे, तालुका संघटक सुनील गायकवाड, रघुनाथ कोळी, शैलेंद्र सातपुते, संजय ठाकरे, प्रभाकर उगले, शेख जावेद, वसीम चेअरमन, संजय पाटील, नाना शिंदे, बापू नवले, अनिल कुडे, दिलीप राठोड, ऋषिकेश देवरे, दिनेश घोरपडे, नंदू गायकवाड, नकुल पाटील, बापू लेणेकर,अजिज मिर्झा, गणेश भवर, धर्मा खंडू काळे, ज्ञानेश्वर शिंदे, संजय पाटील, प्रेमदास पाटील, आधार गायकवाड, रवींद्र चौधरी, दिलीप पाटील, बंटी पाटील, अजित देशमुख, हेमंत निकम, रवींद्र चौधरी, निलेश गायके अदि उपस्थित होते.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/468978954057921/

Protected Content