जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात इनोव्हेशन इन्क्युबेशन अँड लिंकेजेस केंद्राच्यावतीने आयोजित नवउद्योजक कार्यशाळेच्या समारोप गुरूवारी ५ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता करण्यात आला. याप्रसंगी प्र-कुलगुरू प्रा.एस.टी.इंगळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
खान्देशात नवउद्योजक घडवण्यासाठी विद्यापीठाकडून पुर्णत: सहकार्य देण्यात येईल असे प्रतिपादन प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे यांनी केले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात इनोव्हेशन इन्क्युबेशन अँड लिंकेजेस केंद्राच्यावतीने आजी-माजी विद्यार्थीमात्र जे नवउद्योजक होऊ पहात आहेत, त्यांच्याकडून नाविण्यपूर्ण कल्पना मागविण्यात आल्या होत्या. यातील २३ नवउद्योजकांना तीन दिवस निवासी कार्यशाळेत तज्ज्ञामार्फत मार्गदर्शनकरण्यात आले. या कार्यशाळेचा समारोप प्रा. इंगळे यांच्या उपस्थितीत झाला.
भविष्यात आवश्यक त्यावेळी विद्यापीठाकडून पुर्ण सहकार्य केले जाईल असे आश्वासन त्यांनी दिले.समारोप कार्यक्रमाचे सुत्रसंचालन समन्वयक केवल थोरात यांनी केले. सागर पाटील यांनी आढावा घेतला. संचालक डॉ. राजेश जावळीकर यांनी आभार मानले. त्याआधी सकाळच्या सत्रात आशुतोष प्रचंड यांनी बौध्दिकसंपदा हक्क याविषयी मार्गदर्शन केले. राकेश कासार यांनी कंपनी स्थापन करण्याचे विविध प्रकार व त्यांच्या कायदेशीर प्रक्रिया समजावून सांगितल्या. सांगितला. सागर पाटीलयांनी आपल्या कल्पनेला बिझनेस मॉडेलमध्ये कशा प्रकारे रूपांतरीत करावे याबाबतीत मार्गदर्शन केले.