अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील कळमसरे येथील ग्राम पंचायतीमार्फत आदिवासी व बौद्ध बांधवांसाठी ग्रामनिधी मधील १५ टक्के राखीव निधी मधून सार्वजनिक कार्यक्रमांसाठी सुमारे ६० हजार रुपयांच्या भांड्यांचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी सरपंच जगदीश निकम, उपसरपंच जितेंद्रसिंग पाटील, ग्रामविकास अधिकारी श्री ज्ञानेश्वर पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रमिला चौधरी, मीराबाई बडगुजर, मीना कुंभार, लताबाई बिल, रेश्माबाई चौधरी, गणेश चौधरी, संदीप पाटील, दिनकर चव्हाण, पल्लवी चौधरी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
ग्रामपंचायतीमार्फत दरवर्षी अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवून कळमसरे ग्रामपंचायतीने तालुक्यात नवा आदर्श निर्माण केलेला आहे. त्यातच गावातील दिव्यांग बांधवांना पाच टक्के राखीव निधी मधून रोख रक्कम किंवा घरपट्टी करात ५० टक्के सूट देण्यात येत आहे. त्याचा लाभ गावातील दिव्यांग बांधवांनी घ्यावा, असे आवाहन ग्रामपंचायत मार्फत करण्यात आलेले आहे. सदर भांडे वाटप प्रसंगी कैलास चव्हाण, नागराज पारधी, किशोर निकम, विठ्ठल सोलार ,भिका निकम, युवराज पारधी, जितेंद्र चव्हाण तसेच आदिवासी व बौद्ध बांधव उपस्थित होते.