जळगाव, प्रतिनिधी । कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नाव ओझर नाशिक विमानतळाला देण्यात यावे तसेच मागासवर्गीय कर्मचारी यांच्या पदोन्नती बाबत राज्य सरकारचा 7 मे रोजीचे शासन परिपत्रक ( GR ) रद्द करा या प्रमुख मागण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कर्मवीर दादासाहेब गायकवाड नामांतर कृती समिती तर्फे निदर्शने करण्यात आली . समितीतर्फे मा. मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकारी यांचे मार्फत निवेदन सादर करण्यात आले .
कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात उभा महाराष्ट्र पिंजून काढला होता. त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील लाखोंच्या संख्येने आंबेडकरी जनता आंदोलनात सहभागी झाली होती . संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात त्यांचे मोलाचे योगदान होते . तसेच “कसेल त्याची जमीन नसेल त्याचे काय” हि घोषणा देत शेतमजूर कष्टकरी वंचित भूमिहीन जनतेसाठी “भूमिहीन सत्याग्रह” करून लाखो लोक तुरुंगात डांबण्यात आले होते . या भूमिहीन सत्याग्रहामुळे लाखो नागरिकांना दादासाहेब गायकवाड यांनी शेतीचे वाटप करून शेतीचे मालक केले .
अशा महान कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नाव ओझर नाशिक विमानतळाला देण्यात यावे अशी भूमिका समितीची आहे. त्यासाठी निदर्शने आंदोलन करण्यात आले. सदर निदर्शने आंदोलनात मुकुंद सपकाळे , भारत ससाणे, अमोल कोल्हे, संजय सपकाळे, हरिश्चंद्र सोनवणे, प्रा. प्रितीलाल पवार, रमेश सोनवणे, चंदन बिऱ्हाडे , समाधान सोनवणे, नाना मगरे, गौतम सोनवणे , राजू मोरे , दिलीप सपकाळे , कृष्णा सपकाळे , गौतम पानपाटिल , पिंटू सपकाळे , संजय बागूल , ऍड अभिजित रंधे , सचिन बिऱ्हाडे , महेंद्र केदारे , आकाश सपकाळे , गुरुनाथ सैंदाणे , जयपाल धुरंधर व चळवळीतील कार्यकर्ते सहभागी झाले .
https://www.facebook.com/508992935887325/videos/336330968040355