कर्नाटक काँग्रेस अध्यक्ष शिवकुमार यांच्या घरांसह १४ जागी छापे

नवी दिल्ली: वृत्तसंस्था । भ्रष्टाचाराच्या  आरोपांशी संबंधीत गुन्ह्यात सीबीआयने कर्नाटक काँग्रेस अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्या घरासह कर्नाटक, मुबई आणि इतर काही ठिकाणांवर हे छापे टाकले . नंतर कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धारमय्या यांनी भाजपने नेहमीच बदल्याचे राजकारण केल्याचा आरोप केला

सिद्धरामय्या यांनी ट्विट करत हा आरोप केला आहे. ते लिहितात, ‘भारतीय जनता पक्ष नेहमीच बदल्याचे राजकारण व जनतेचे लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न करत आला आहे. शिवकुमार यांच्या घरावर टाकण्यात आलेले सीबीआयचे छापे ही पोटनिवडणुकीतील आमच्या तयारीवर परिणाम व्हावा या उद्देशाने टाकण्यात आले आहेत. मी याचा निषेध करतो.’

अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आयकर विभागाच्या कर चोरीच्या आरोपाबाबत केलेल्या कारवाईच्या आधारे मनी लाँड्रिंग गुन्ह्याचा तपास करत होते. दरम्यान ईडीला काही माहिती मिळाली. ही माहिती ईडीने सीबीआयकडे दिली होती. सीबीआयने याच माहितीच्या आधारे डी. के शिवकुमार यांच्या घरावर छापे टाकले आहेत.

काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी रणदीप सुरजेवाला यांनी सीबीआयच्या या कारवाईवरून मोदी आणि एडियुरप्पा सरकारवर टीका केली आहे. भाजप आणि केंद्र सरकारपुढे काँग्रेसचे कार्यकर्ते कधीही घाबरणार नाही, किंवा कधीही झुकणार नाही, असे सुरजेवाला यांनी म्हटले आहे.

 

सीबीआय कर्नाटक आणि मुंबईसह एकूण १४ जागांवर ही छापेमारी करत आहे. यात डी. के. शिवकुमार, त्यांचे कुटुंबीय आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या घरांचा समावेश आहे.

Protected Content