यावल प्रतिनिधी । शेतकरी कर्जमाफीच्या पहिल्या टप्प्यात समावेश असणार्या हिंगोणा विकासोच्या सदस्यांच्या खात्यात ५४.८७ लाख रूपये जमा झाले असून त्यांचे खाते निरंक करण्यात आले आहे.
याबाबत वृत्त असे की, महाराष्ट्र शासनाने नुकतीच महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना केलेली आहे. यात पहिल्या टप्प्यात हिंगोणा येथील वि. का. सोसायटीचा समावेश आहे. यातील आधार प्रमाणीकरण करण्यासाठी संस्थेने ११२ सभासदांचे प्रमाणीकरण पूर्ण करून घेतलेले आहे. त्यापैकी शासनाने ७६ सभासदांच्या खात्यांमध्ये ५४ .८७ लाख कर्ज खाती वर्ग करून सभासदांचे खाते निरंक करण्यात आलेले आहेत
महाराष्ट्र शासन आय टी. विभाग मुंबई यांच्या पथकाने नुकतीच हिंगोणा विकासोला भेट दिली व काही शेतकरी कर्ज माफी पासुन वंचीत राहीलेले आहे त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच त्या ठिकाणी गणेश मोरे महाराष्ट्र शासन आय. टी. विभाग अधिकारी यांनी सोसायटी सचिवांना राहीलेले कर्ज माफीदार त्याचे पण पाठपुरावा करा असे सागितले यावेळी विजय गवळी. सहायक निबधक जळगाव. मेघराज राठोड, जिल्हा.उपनिबधंक जळगाव, चेअरमन. व्हा. चेअरमन संतोष सावळे, के. पी. पाटील सहाय्यक निबंधक यावल, एम. पी. भारंबे, पी. डी. पाटील, विनोद देशमुख, पी. एन राणे, ए. टी. तायडे, सी. के. महाजन, विजयसिंह पाटील वि का सचिव हिगोणा सदस्य राजेद्र महाजन. ललीत महाजन. सुभाष गाजरे. शेतकरी तुकाराम लोढे. दिलीप वायकोळे. प्रभाकर बोंडे. संजय चौधरी. नामदार तडवी आदी उपस्थित होते.
या संदर्भात विकासोचे व्हाईस चेअरमन संतोष सावळे म्हणाले की, शेतकरी या योजनेचे १०० टक्के लाभ घेणार आहे सोसायटीचे आधार प्रमाणीकरणचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. तसेच या कर्ज माफी मध्ये सोसायटीला नफा राहणार आहे. तर, विजयसिंह पाटील यांनी सांगीतले की , वि .का.सो हिंगोणा सचिव ,महात्मा ज्योतिबा फुले ही कर्ज माफी योजना मी शेतकर्यांपर्यंत यशस्वीरीत्या पोहोचू शकलो याचा मला सार्थ अभिमान आहे