कर्जबाजारी सलून व्यावसायिकाची गळफास घेवून आत्महत्या

जळगाव प्रतिनिधी । शहरातील लक्ष्मीनगरात राहणाऱ्या तरूणाने कर्जबाजारीला कंटाळून राहत्या घरात दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे आज सकाळी उघडकीला आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

गजानन कडू वाघ (वय-३५) रा. माळपिंप्री ता. जामनेर ह.मु. लक्ष्मी नगर, जळगाव असे मयत तरूणाचे नाव आहे. गजानन वाघ हा नोकरीच्या निमित्ताने जळगावातील लक्ष्मीनगर येथे भाड्याच्या घरात गेल्या काही वर्षांपासून पत्नी सरला व दोन मुलांसह राहतो. सलून दुकानावर सलुनचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो.  गजानन वाघ हा काही दिवसांपासून तणावात राहत असल्याची माहिती भाऊ ईश्वर याने दिली.  गतवर्षी लागलेल्या लॉकडाऊनमुळे दुकाने बंद पडली. त्यामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न त्यांच्या समोर ठाकला होता. सुरूवातीच्या काळात सुलन दुकानादारांकडून काही प्रमाणात मदत मिळाली. परंतु, नंतर लॉकडाऊन वाढतच गेल्यामुळे वाघ यांची आर्थिक परिस्थिती पुर्णपणे ढासाळली. याला कंटाळून राहत्या घरात मध्यरात्री दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची धटना आज सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास उघडकीला आली आहे. भाऊ ईश्वर वाघ याने मृतदेह खाली उतरवून जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय  सोनवणे यांनी मृत घोषीत केले. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. मयताच्या गजाननच्या पश्चात आई लताबाई, पत्नी सरला, ईश्वर आणि रामेश्वर दोन भाऊ,  मुलगा ऋषीकेश (वय ५) व मुलगी वैष्णवी (वय ३) असा परिवार आहे.

 

Protected Content