याबाबत नातेवाईकांकडून मिळालेली माहिती अशी की, बोदवड तालुक्यातील वरखेड येथे नितीन गणेश राणे हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. त्यांची गावातच शेती असून शेती करुन ते कुटुंबाचा उदनिर्वाह करतात. गेल्यावेळेस शेतात कपाशीची लागवड केली होती. परंतु त्यातून निम्म उत्पन्न देखील मिळाले नाही. त्यातच डोक्यावर कर्जाचा डोंगर असल्याने त्यातूनच नितीन राणे यांनी शेतात ङ्गवारणीचे औषध पिवून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्यावर जळगावातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. दरम्यान, उपचार सुरु असतांना दि. १० रोजी सकाळी ९.४५ वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी व मुलगा असा परिवार आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
कर्जबाजाराला कंटाळून घेतले विष : तरूण शेतकऱ्याचा मृत्यू
3 years ago
No Comments