कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येकाने काळजी घ्यावी – डॉ. संदीप पाटील

 

रावेर, प्रतिनिधी । जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरस याचा प्रादुर्भाव आपल्या गावांमध्ये होऊ नये म्हणून प्रत्येकाने आपल्या परीने काळजी घेण्याचे अवाहन डॉ. संदीप पाटील यांनी केले आहे.

रावेर येथील माऊली हॉस्पिटलमध्ये डॉ. संदीप पाटील यांच्या तर्फे जिवघेण्या कोरोनाचा वायरस संदर्भात माहिती पुस्तक देऊन जन-जागृती करण्यात आली तसेच अजुन ५०० नागरिकांनी हे पुस्तक वाटण्यात येणार आहे. समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींनी आपापल्या परीने सामान्य नागरिकांना व आपल्याशी संपर्कात असलेल्या लोकांना यासंदर्भात जन-जागृती निर्माण करण्यासाठी योग्य ती पावले उचलणे महत्त्वाचे आहे. म्हणून सर्व नागरिकांनी जबाबदारी लक्षात घेता आपापल्या परीने योग्य ते योगदान देणे गरजेचे आहे. त्याचाच एक भाग म्हणून रावेर येथे माऊली हॉस्पिटलमध्ये श्रीरोग तज्ञ डॉ. संदीप एस पाटील  यांनी कोविंड एकोणावीस (करोना) या आजाराच्या संदर्भातील पुस्तिकांचे वाटप करून सर्व जाती व धर्माच्या पेशंटला यासंदर्भात घ्यावयाच्या काळजी घेण्याचे माहिती साध्या आणि सोप्या भाषेत असलेली पुस्तिका तयार करून वाटप करण्यात आली आहे.

Protected Content