करोना संसर्गचा चीनमध्ये जोर कमी

 

बीजिंग, वृत्तसेवा । कोव्हिड १९’ हा जागतिक साथरोग (पॅन्डेमिक) असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्यावतीने जाहीर करण्यात आल्यानंतर चीनने आज एक दिलासादायक बातमी दिली आहे. करोनाचा संसर्ग चीनमध्ये कमी होत असून जोर ओसरला असल्याची माहिती समोर आली आहे. करोनावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवण्यात यश आले असल्याची माहिती राष्ट्रीय आरोग्य विभागाने दिली.

जगभरात थैमान घालणाऱ्या करोना व्हायरसचा संसर्ग वुहान शहरात पहिल्यांदा झाला. त्यानंतर चीनमधील ३१ प्रातांत करोनाचा संसर्ग झाला. चीनमध्येच करोनाचा संसर्ग आहे असे वाटत असतानाच त्याने इतर देशातही फैलावण्यास सुरुवात केली. दक्षिण कोरिया, इराण, इटली, अमेरिकेतही करोनाचा संसर्ग फैलावला आहे. इटली व इराणला करोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. तर, दुसरीकडे चीनमध्ये करोनाचा जोर ओसरला असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. करोनाबाधित रुग्णांची संख्या मागील दिवसांमध्ये घटली आहे. मृतांच्या संख्येतही घट झाली असल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे.

Protected Content