‘करोना’ विषाणूला नवे नाव ‘कोविड-१९’

ssZGg3at5Tad2PpEyUCKh3 320 80

जिनीव्हा, वृत्तसंस्था । जागतिक आरोग्य संघटनेने ‘करोना’ विषाणूला नवीन नाव दिले आहे. करोना विषाणूला आता ‘कोविड-१९’ असे अधिकृत नाव जागतिक आरोग्य संघटनेने दिले आहे. हा विषाणू ३१ डिसेंबर २०१९ रोजी पहिल्यांदा चीनमध्ये आढळला होता.

 

जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस एधानोम गेब्रेयेसुसने यांनी सांगितले की, करोना विषाणूला अधिकृत नाव देण्यात आले आहे. कोविड-१९ असे त्याचे नाव असून को म्हणजे करोना, व्ही म्हणजे व्हायरस आणि डी म्हणजे डिसीज (आजार) असा त्याचा अर्थ असल्याचे त्यांनी सांगितले.

जागतिक आरोग्य संघटनेने करोनाला जगासाठी धोका असल्याचे म्हटले आहे. डिसेंबरमध्ये हा विषाणू आढळल्यानंतर चीनमध्ये १००० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तर, ४२ हजारहून अधिक जणांना या आजाराची लागण झाली आहे. आतापर्यंत जगातील २५ देशांमध्ये हा आजार पसरला आहे. हा विषाणू नेमका कसा निर्माण याबाबत शास्त्रज्ञांकडून शोध सुरू आहे.

चीनमध्ये स्थिती गंभीर, मदतीला आंतरराष्ट्रीय पथक
या विषाणूची निर्मिती वटवाघळांच्या माध्यमातून झाली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. वटवाघळानंतर हा विषाणू माणसांमध्ये साप व अन्य प्राण्यांच्या माध्यमातून पसरला असल्याची शक्यता आहे. चीन, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, जर्मनी, अमेरिका आदी देशांसह इतर देशांतील औषधनिर्मिती कंपन्या करोनाच्या संसर्गावर लस शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

 

jalgaon corona, jalgaon corona news, jalgaon coronavirus, corona in jalgaon, jalgaon corona cases, covid 19 jalgaon, jalgaon corona update, live trends jalgaon, live trends news jalgaon, jalgaon corona news today,
livetrends jalgaon, covid19 e pass jalgaon, jalgaon latest news

Protected Content