Home राष्ट्रीय कमल हासनच्या चित्रपटाच्या सेटवर अपघात : तीन ठार; दहा गंभीर

कमल हासनच्या चित्रपटाच्या सेटवर अपघात : तीन ठार; दहा गंभीर

0
64
kamal haasan

kamal haasan

चेन्नई । दिग्गज अभिनेता कमल हासनचा आगामी चित्रपट इंडियन २ च्या सेटवर रात्रीच्या सुमारास झालेल्या अपघातामध्ये तिघेजण जागीच ठार झाले असून दहा जण गंंभीर जखमी आहेत.

चेन्नईतील ईव्हीपी फिल्मसिटीमध्ये इंडियन २ चे चित्रीकरण सुरु आहे. यावेळी सेटअप तयार करत असताना क्रेन सेटवर कोसळली. या दुर्घटनेमध्ये तीन जण जागीच ठार झाले तर १० जण जखमी झाले आहेत. या घटनेची कमल हासननेही पुष्टी केली असून त्याने दुःख व्यक्त केले आहे. आज झालेला अपघात हा माझ्या करियरमधील कधी न पाहिलेला भीषण अपघात होता. मी माझे तीन सहकारी गमावले. पण त्याहून मोठे दुःख त्यांच्या नातेवाईकांचे वाटते. असे ट्विट हसन यांनी केले आहे.

कमल हासन यांच्या १९९६ साली प्रदर्शीत झालेल्या इंडियन या चित्रपटाला रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला होता. आता याच चित्रपटाचा इंडियन-२ या नावाने सिक्वेल तयार करण्यात येत असून याच्या चित्रीकरणाच्या दरम्यान हा अपघात घडला आहे.


Protected Content

Play sound