भुसावळ : प्रतिनिधी । तालुक्यातील कंडारी गावातील कपिलेश्वर महादेव मंदिर भाविकांसाठी भाजप वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ.नितु पाटील आणि परिवारातर्फे २ स्वयंचलित इलेट्रिक हात सँनिटायझर मशीन आणि इतर साहित्य भेट देण्यात आले.
कंडारी गावात मकरसंक्रातीला कपिलेश्वर महादेव मंदिर परिसरात यात्रा भरत असून भाविकांची गर्दी होते,पण यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता जिल्हा प्रशासनाने यात्रेला बंदी आहे भाविकांसाठी दर्शनाची मुभा दिली आहे.
मंदिर व्यवस्थापनाकडून केलेल्या आवाहनाला भुसावळचे डॉ.नितु पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देत त्यांच्या ॐ सिद्धगुरु नित्यानंद प्रतिष्ठानतर्फे आज २ स्वयंचलित इलेट्रिक हात सँनिटायझर मशीन, ५०० मास्क, १२१ श्री.शिवलीला अमृताचे ११वा अध्यायचे पुस्तक आदी मंदिर व्यवस्थापक सदस्य मुरलीधर जेठवे यांच्याकडे देण्यात आले.
कंडारीवासियांच्या वतीने डॉ.नितु पाटील,डॉ.सौ.रेणुका पाटील व परिवाराचा सत्कार करण्यात आला.
यावेळी मंदिर व्यवस्थापक सदस्य मुरलीधर जेठवे, विशाल सूर्यवंशी, वैशाली पाटील, वेदांत पाटील, दुर्वांग पाटील, कल्पना मोरे, चक्रवर्ती अशोक सम्राट प्रतिष्ठानचे अध्यक्ष विक्की मेश्राम, सुरेंद्र सोनवणे, संजय मोरे, राकेश मोरे, भूषण मोरे, चंद्रकांत साळुंके आदी ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन विशाल सूर्यवंशी तर आभार प्रदर्शन विक्की मेश्राम यांनी केले