Home क्राईम कपाशीच्या शेतात अज्ञाताने फवारले तणनाशक ; पोचोरा पोलिसांत गुन्हा दाखल

कपाशीच्या शेतात अज्ञाताने फवारले तणनाशक ; पोचोरा पोलिसांत गुन्हा दाखल

0
31

पाचोरा, प्रतिनिधी  ।  तालुक्यातील   सातगाव (डोंगरी) येथील ईश्वर नथुसिंग पाटील यांच्या मालकीच्या दोन एकर कपाशी लावलेल्या शेतावर अज्ञाताने तणनाशक फवारल्याने नुकतेच उगवण झालेल्या कपाशीचे रोपे जळाली आहे.

याबाबत सविस्तर असे की, सातगाव (डोंगरी)  शिवारात ईश्वर पाटील यांचे शेत असून ते कपाशी लावलेल्या शेतात ज्या ठिकाणी खाडे पडलेले आहेत त्या ठिकाणी बियाणे लावण्यासाठी आज दुपारी गेले असता त्यांना कपाशीची उगवण झालेली कोवळी कोमल रोपे जळाल्याचे दिसून आले.  सदर शेताचे क्षेत्र एकूण तीन एकर असून शेताच्या एका पांदीच्या बाजूला अंदाजे दोन एकर क्षेत्रावर अज्ञाताने तणनाशकाची फवारणी केल्याने कपाशी पिकाचे नुकसान झाले आहे. ईश्वर पाटील यांनी सदर घटना गावातील पोलिस पाटील दत्तू पाटील यांना बोलावून त्यांच्या निदर्शनास आणून दिली.  त्यानंतर ईश्वर पाटील पिंपळगाव (हरेश्वर) ता. पाचोरा येथील पोलिस स्टेशनला जाऊन, अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.  सदर घटनेचा तपास बीट हवालदार राजेश खोंडे व त्यांचे सहकारी करीत असून, विकृती करणाऱ्या व्यक्तीविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

 


Protected Content

Play sound