पाचोरा : प्रतिनिधी ! माणुसकी समुहाचे जळगाव जिल्हाअध्यक्ष समाजसेवक गजानन क्षीरसागर यांनी आज लोहारा ( ता. पाचोरा) येथे जागतिक बालिका दिनाचे औचित्य साधून नऊ कन्यारत्न प्राप्त माता-पित्यांचा सत्कार केला
शासनाचे “बेटी बचाओ बेटी पढाओ” हे अभियान नाममात्र फक्त कागदावरच आहे ते प्रत्यक्षात आणण्याकरिता आपल्याला पुढे येणे गरजेचे आहे. मुलींना दुय्यम समजणाऱ्या प्रथा नष्ट करण्यासाठी २०१६ पासून माणुसकी समूहाच्या माध्यमातून “बेटी बचाओ बेटी पढाओ” मोहीम चालू आहे ज्या कुटुंबात मुलीचा जन्म झाला तिच्या वडिलांना २ महिने २१ दिवस सलून सेवा मोफत , शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार , आई साडीचोळी आणि मुलीला ड्रेस मुलीचे जावळ देखील मोफत असा उपक्रम सुमित पंडित यांनी चालू केलेला आहे. त्यात हातभार म्हणून आम्ही देखील जळगाव जिल्ह्यात आमच्या परीने छोटासा उपक्रम सुरू केला आहे असे गजानन क्षीरसागर यांनी सांगितले.
या जोडप्यांचा आज सत्कार झाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण होते. या कार्यक्रमासाठी बापू पाटील, अमोल जाधव, गजानन क्षीरसागर, महेंद्र घोंगडे, योगेश वाणी, बद्गुजर भाऊ, चेतन पाटील, दत्तात्रय तेली, रूपाली क्षीरसागर, रोहिणी जाधव, वैशाली वाणी, सुरेखा गडरी आदी उपस्थित होते.