जळगाव प्रतिनिधी | जळगाव ते अजिंठा महामार्गावर मंगळवारी दुपारी १.१० वाजता एमआयडीसी पोलिसांनी कुसुंबा ते गोशाळा दरम्यान १२ बैलांना कत्तलीसाठी घेऊन जात असलेला ट्रक ताब्यात घेतला आहे. १२ बैलांची सुटक करण्यात आली आहे. या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुसुंबा येथे बसस्थानक ते गोशाळा दरम्यान बैलांना घेऊन जाणारा ट्रक (एमएच-६, एजी-७६२४) ग्रामस्थांनी अडवून ठेवला होता. त्यामध्ये आठ बैल असून त्यावर कारवाई करण्याबाबत एमआयडीसी पोलिसांना नागरिकांनी फोनद्वारे कळवले होते. एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी गेले. ट्रकमध्ये कत्तलीसाठी ४ लाख रुपये किमतीचे १२ बैल घेऊन जात असल्याचे आढळून आले. बैल कुसुंबा येथे गोशाळेच्या ताब्यात देण्यात आले आहेत. या प्रकरणी अस्लम खान मेहमूद खान (वय ४६ रा.पाळधी ता.धरणगाव) याला अटक करण्यात आली आहे. एमआयडीसी पोलिस ठाण्याचे कॉन्स्टेबल गोविंदा पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.