जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील विविध कंपनीच्या कामगारांच्या मागण्या पुर्ण कराव्यात अन्यथा तिव्र आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आले असून सहाय्यक कामगार आयुक्तांना आज सोमवारी दुपारी निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात असे म्हटले आहे की, कल्याणी ब्रिक्स लिमिटेड, बॉश लिमिटेड, फाउंडेशन ब्रेक मॅन्युफॅक्चरिंग प्रायव्हेट लिमिटेड व आता ऑटोमोटिव्ह प्रायव्हेट लिमिटेड बांभोरी, जळगाव अशा अनेक वेळा नाव बदल झालेल्या कंपनीत काम करणाऱ्या सर्व कामगारांना लागू असलेल्या भारतीय कामगार कायद्यांतर्गत वेतन सोयी-सुविधा, कुशल कामगार सेनेचे वेतन इत्यादी मिळणेबाबत व कंपनीच्या सेवेत लवकरात लवकर कायम करण्याबाबत तसेच सदरील कामगारांचे प्रश्न त्वरित न सुटल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असे असे मनसेचे राजेंद्र निकम यांनी सहाय्यक कामगार आयुक्तांना सांगितले.
या आहेत मागण्या
1. भारतीय व महाराष्ट्र कायद्यांतर्गत सर्व सोयी सुविधा मिळाव्यात
2. कुशल कामगार श्रेणीतील किमान वेतन मागील अरीयर्स सहीत मिळावा.
3. ओवर टाइम कारखाना नियमानुसार मेळावा
4. साप्ताहिक सुट्टीचा लाभ कायद्यानुसार मिळावा
5. तसेच सदरील कामगार हे मागील वीस ते पंचवीस वर्षापासून अखंडित कायम स्वरूपाचे काम करीत असल्याने कायद्यानुसार त्यांना मा. सर्वोच्च न्यायालयाच्या न्याय-निवाड्यानुसार कंपनीचे हजेरी पटावर कायमस्वरूपी सेवेत सामावून घ्यावे. आदी मागण्यांसाठी कंपनी समोर कामगारांनी साखळी पध्दतीने उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला मनसेने पाठींबा दिला आहे.
निवेदन देतांना मनसेचे जिल्हा संघटक निकम, महेश माळी, गणेश नेरकर, गोविंद जाधव, विशाल कुमावत, नीलेश खैरणार, निलेश अजमेरा, कंत्राटी कामगार चंदू नन्नवरे, नरेंद्र पाटील, ज्ञानेश्वर पाटील, विक्रम ठाकुर, योगेश सोनवणे, संजय माने, गणेश महाजन, प्रताप सोनवणे आदी उपस्थित होते.