जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील भाजीपाला मार्केट समोरील समर्थ इंटरप्राईजेस येथील काम करणाऱ्या कामगारांनेच ७५ हजार रुपये किमतीचे तांब्याचे तार व इतर साहित्य चोरून येण्याची घटना समोर आली आहे. याबाबत गुरुवार ९ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमआयडीसी पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, निलेश प्रभाकर जोशी (वय-४२) रा. नवीन जोशी कॉलनी, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्यांचे जळगाव शहरातील भाजीपाला मार्केट समोर समर्थ इंटरप्राईजेस नावाचे दुकान आहे. त्या ठिकाणी पितळी व कॉपरचे तारांची विक्री केली जाते. या दकानात दीपक पंढरीनाथ कोळी रा. जैनाबाद, जळगाव हा कामाला होता. १५ डिसेंबर २०२२ ते १४ जानेवारी २०२३ दरम्यान दीपक कोळी याने कामावर हजर असताना दुकानातून तांब्याचे तार व इतर साहित्य असा एकूण ७५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल त्याने वेळोवेळी चोरून नेला. हा प्रकार निलेश जोशी यांना लक्षात आल्यानंतर त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुरुवारी ९ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता संशयित आरोपी दीपक पंढरीनाथ कोळी रा. जैनाबाद, जळगाव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक दत्तात्रय बडगुजर करीत आहे.