जळगाव प्रतिनिधी । शहरातील कंजरवाडा परिसरात खुलेआम दारू विक्री होत असून एमआयडीसी पोलीस स्थानकाच्या पथकाने अशाच प्रकारे दारू विक्री करणार्यांना अटक केली आहे.
याबाबत वृत्त असे की, संचारबंदीमुळे शहरातील सर्व दारू विक्रीची दुकाने, परमीट रूम आणि बियर बार बंद असतांनाही बर्याच ठिकाणी अवैध दारू विक्री होत आहे. या पार्श्वभूमिवर, आज भर दिवसा कंजरवाडा परिसरात दारू विक्री होत असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली होती. त्यांनी येथे छापा मारून मोठ्या प्रमाणात दारू साठा जप्त करून एका इसमाला ताब्यात घेतले आहे.
पहा : अवैध दारू विक्रीवरील कारवाईचा लाईव्ह व्हिडीओ.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/2483628045234226