जळगाव प्रतिनिधी । ‘येथे दारू मिळत नाही, तुम्ही येथून निघून जा’ असे बोलल्याच्या कारणावरून सचिन सुरेंद्र अभंगे (२७, रा. कंजरवाडा) यास चौघांनी मारहाण करून डोक्यात तलवारने वार करीत गंभीर जखमी केल्याची घटना मार्च महिन्यात घडली होती. यातील तिघांना शुक्रवारी रात्री अटक केली होती. यातील फरार चौथ्या संशयितास शनिवारी मध्यरात्री राहत्या घरातून अटक केली आहे. अक्षय आधार नेतले (वय-२१) रा. कंजरवाडा असे संशयित आरोपीचे नाव आहे.
काय आहे हे प्रकरण
३० मार्च रोजी कंजरवाडा येथे अक्षय नेतलेकर हा चोरून दारू विक्री करीत होता. त्यामुळे दारू खरेदी करण्यासाठी काही नागरिक त्याच्याजवळ आले असता, त्याचवेळी सचिन सुरेंद्र अभंगे हा तरूण त्याठिकाणी आला व त्याने येथे दारू मिळत नाही, तुम्ही येथून निघून जात असे सांगितले़ असे बोलल्याचे वाईट वाटून अक्षय नेतलेकर याने विजय नेतलेकर, पिंटू नेतलेकर, सुरज नेतलेकर यांना बोलवून चौघांनी सचिन यास शिवीगाळ करीत मारहाण केली़ नंतर सुरत नेतलेकर याने तलवार आणून ती सचिन याच्या डोक्यात मारली़ त्यात तो गंभीर जखमी झाला़ अखेर याप्रकरणी ३१ माच रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात सचिन अभंगे यांच्या फिर्यादीवरून हल्ला करणाºया चौघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता़ तसेच घटना घडल्यापासून चौघे संशयित फरार झाले होते.
यातील संशयित आरोपी विजय नेतलेकर, पिंटू नेतलेकर, सुरज नेतलेकर यांना शुक्रवारी मध्यरात्री अटक केली होती. आज शनिवारी मध्यरात्री राहत्या घरातून २ वाजता चौथा संशयित आरोपी अक्षय आधार नेतले याला पोहकॉ मुदस्सर काझी, इम्रान सय्यद अटक केली. पुढील तपास पीएसआय विशाल वाठोरे करीत आहे.