मुंबई वृत्तसंस्था । अभिनेत्री कंगना रणौतविरोधात विधानपरिषदेत हक्कभंग प्रस्ताव मांडण्यात आला. काँग्रेसचे नेते आणि विधानपरिषद सदस्य भाई जगताप यांनी सभागृहात हा प्रस्ताव मांडला.
यापूर्वी शिवसेनेकडून रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरोधातही विधानसभेत हक्कभंग प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्यानंतर विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला होता. दरम्यान, गोंधळानंतर काही वेळासाठी विधानसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं होतं. त्यानंतर भाई जगताप यांनी विधानपरिषदेत कंगना रणौतविरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडला.
“हा हक्कभंग केवळ हक्कभंग नसून ती मुंबई महाराष्ट्राशी कंगना रणौतनं केलेली गद्दारी आहे याचा उल्लेख करावासा वाटेल. २०१६ मध्ये कंगना रणौत अध्ययन सुमन याला कोकेन घेण्यास सांगत होती असं त्यानंच सांगितलं होतं. अशी महिला आपल्या मुंबईबद्दल बोलते त्यामुळे हक्कभंग आणला आहे. याबाबतीत आमच्याकडे सर्व पुरावे आहेत,” असं भाई जगताप यावेळी म्हणाले.