कंगना राणावतवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा : राष्ट्रवादीची मागणी (व्हिडिओ)

जामनेर भानुदास चव्हाण | अभिनेत्री कंगना राणावत यांनी भारत देशाच्या स्वातंत्र्यावर बेताल वक्तव्य करून देशाचा व स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान केला आहे. त्यांना दिलेला पद्मश्री पुरस्कार परत घेऊन त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी जामनेर तालुक्याच्या वतीने पोलीस उपनिरीक्षक अरुण राठोड यांना लेखी निवेदन देण्यात आली.

 

अभिनेत्री कंगना राणावत यांनी पद्मश्री किताब मिळाल्यानंतर बेताल व्यक्त केला असून १९४७ मध्ये मिळालेले स्वातंत्र्य हे भीकमध्ये मिळाले होते खरे स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळाले आहे असे बोलून स्वातंत्र्य सैनिक व स्वातंत्र्य सेनानी यांचा घोर अपमान कंगना राणावत यांनी केला आहे त्यामुळे अशा कम बुद्धीच्या लोकांना पद्मश्री पुरस्कार कशाच्या आधारे देण्यात आला आहे ते पद्मश्री पुरस्कार केंद्र शासनाने परत घ्यावे व कंगना राणावत यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे करण्यात आली आहे. याप्रसंगी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी महिला जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी, राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख किशोर पाटील, शहराध्यक्ष पप्पू पाटील, पंचायत समिती सदस्य छाया पाटील, कविता बोरसे, अशोक चौधरी, डॉ. बाजीराव पाटील, उत्तम पाटील, प्रल्हाद बोरसे, अहेकाज अहमद मुल्ला जी, शाहिद इक्बाल, युवराज पाटील, मोहन चौधरी, विनोद माळी, प्रभू झाल्टे, दत्तात्रय नेरकर, अजहर शेख, निखिल निकम, राजू शेख, अहमद खान आदी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पदाधिकारी उपस्थित होते.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/215533860713183

Protected Content