Home धर्म-समाज औषध वेळेवर घेत चला ; मिटकरींचा पोंक्षेंना टोला

औषध वेळेवर घेत चला ; मिटकरींचा पोंक्षेंना टोला


पुणे (वृत्तसंस्था) डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्यापेक्षा सावरकरांचं योगदान श्रेष्ठ आहे, असे अभिनेते शरद पोंक्षे म्हणाले होते. यावर पोंक्षे, औषध वेळेवर घेत चला, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस अमोल मिटकरी यांनी लगावला आहे.

 

पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातील कार्यक्रमात अभिनेते शरद पोंक्षे यांनी अस्पृश्यता निवारणात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे योगदान मोठे आहे, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. पोंक्षे यांनी व्यक्त केलेल्या या वक्तव्यामुळे मोठ्या वादाला तोंड फुटले आहे. ‘मी सावरकर’ वक्तृत्व स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात बोलत होते. यावर पोंक्षे, औषध वेळेवर घेत चला, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस अमोल मिटकरी यांनी लगावला आहे.


Protected Content

Play sound