औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या १३०० वर पोहचली !

औरंगाबाद (वृत्तसंस्था) औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या १३०० झाल्यामुळे आरोग्य यंत्रणेच्या चिंतेत भर पडली आहे.

 

आज सकाळी २३ रुग्ण आढळल्यानंतर दुपारी पुन्हा ५९ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. यामुळे आज एकूण ८२ रुग्णांची नोंद झाली. यासोबत जिल्ह्यात आढळलेल्या रुग्णांची एकूण संख्या १३०० वर पोहचली आहे. औरंगाबादमध्ये आज सकाळी , एमजीएम परिसर (१), एन-५ सिडको (१), एन १२, हडको (१) पहाडसिंगपुरा (१), भवानी नगर (१), सादाफ नगर(१), रेहमानिया कॉलनी (१), महेमूदपुरा(१), औरंगपुरा (१), एन-८ (१),वडगाव कोल्हाटी (१), एन-४, गणेश नगर (१), ठाकरे नगर, एन-२ (२), न्याय नगर (३), बायजीपुरा (१), पुंडलिक नगर (२), बजरंग चौक, एन-७ (३) या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये सहा महिला आणि १७ पुरूष रुग्णांचा समावेश आहे.

Protected Content