औरंगाबादेत अवघ्या काही तासात कोरोनाचे तब्बल १७ रुग्ण आढळले

औरंगाबाद (वृत्तसंस्था) औरंगाबादेत आज (रविवार) सकाळी आणखी तब्बल १७ कोरोना रुग्ण आढळून आल्यामुळे चिंतेचे वातावरण पसरले आहे. शहरातील रुग्णांचा आकडा आता २७३ वर पोहोचलाय.

 

 

आज सकाळी सापडलेल्या रुग्णांमध्ये मुकुंदवाडीतील १६ तर बायजीपुरा येथील एक रुग्ण आहे. शुक्रवारी ३९ शनिवारी ४० आणि रविवारी १७ असे तीन दिवसांत एकूण ९६ रुग्ण वाढले. औरंगाबादमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर औरंगाबादेत सम आणि विषमचा प्रयोग राबवणार आहे. त्यामुळे सम तारखेला सकाळी ११ पर्यंत सर्व जीवनावश्यक सेवा सुरु राहणार आहे. तर विषम तारखेला वैद्यकीय वगळता सर्व सेवा बंद राहणार आहेत. दरम्यान, औरंगाबादेत धक्कादायक पद्धतीने कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे जिल्हा अलर्टवर आला आहे.

Protected Content