औरंगाबादमध्ये नमाज पठणासाठी जमलेल्या जमावाचा पोलिसांवर हल्ला

औरंगाबाद (वृत्तसंस्था) औरंगाबादमध्ये नमाज पठणासाठी एकत्र आलेल्या लोकांना समजावण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर दगडफेक करण्यात आली आहे. या हल्ल्यात १ पोलीस आधिकारी, २ कर्मचारी जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे औरंगाबादमध्ये गेल्या २४ तासात ४३ कोरोना रुग्णांची वाढ झाली असून रुग्णांचा आकडा ९५ वर पोहोचला आहे.

 

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शहरात संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आला आहे. तसेच शहरातील सर्व धार्मिक स्थळंही बंद ठेवण्यात आली असूनदेखील औरंगाबादमध्ये काही लोक नमाज पठणासाठी एकत्र आले होते. यावेळी नमाजासाठी एकत्र आलेल्या लोकांना समजावण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर दगडफेक करण्यात आली आहे. संबंधित प्रकरणातील २७ हल्लेखोरांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. तर या हल्ल्यात १ पोलीस आधिकारी, २ कर्मचारी जखमी झाले आहेत. दरम्यान, एकट्या औरंगाबादमध्ये गेल्या २४ तासांत ४२ रूग्णांची वाढ झाली आहे. त्यातील ६ जण १६ वर्षांखालील तर ७ जण ४४ वर्षांखालील आहेत. औरंगाबादमध्ये आतापर्यंत २६ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर सहा जणांचा मृत्यू झाला आहे.

Protected Content