पुणे, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – औरंगाबाद येथे जमावबंदी आदेश लागू करण्यात आले नाहीत असे पोलीस आयुक्त यांनी स्पष्ट केले, त्यानंतर १ मे महाराष्ट्र दिनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा नियोजित वेळापत्रकानुसार होणार असल्याचे संकेत आहेत.
राज ठाकरे यांच्या सभेला अजूनही परवानगी देण्यात आलेली नाही, तसेच औरंगाबादमध्ये जामवबंदी लागू झाल्याचे वृत्तानंतर पोलीस आयुक्त यांनी तसे कोणतेही आदेश दिले नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर राज ठाकरेंची एक मे रोजीची सभा नियोजित वेळापत्रकानुसार होणार असल्याचे संकेत असून मनसे कार्यकर्त्यांकडून या सभेची तयारी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर मनसे नेत्यांची आज शिवतीर्थावर बैठक घेण्यात आली असल्याची माहिती मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी दिली.
परवानगी मिळालेली नाही तसेच जमावबंदीमुळे सभेत काही अडचणी निर्माण होऊ शकतात किंवा काय यासंदर्भात औरंगाबाद सभेबद्दल सकारात्मक असून उद्या किंवा परवा बाळा नांदगावकर आणि स्वतः तेथे जाणार असल्याचे मनसेचे नितीन सरदेसाई यांनी म्हटले आहे. तसेच राज ठाकरे सभेच्या दिवशी किंवा एक दिवस आधी तिथे पोहोचतील किंवा औरंगाबादला जाण्यापूर्वी मुंबई नंतर पुणे दौऱ्यावर जाण्याची शक्यता असल्याचेही सरदेसाई यांनी सांगितले.