चाळीसगाव – लाईव्ह ट्रेन्ड्स न्यूज प्रतिनिधी | चाळीसगाव ते छत्रपती संभाजीनगर रोडवरील औट्रम घाटात नेहमीच वाहतूक कोंडी होत असल्याने वाहन धारकांना मनस्ताप सहन करावा लागत असे. परंतु आता वाहतुक व्यवस्थेत बदल झाले असून अवजड वाहनांवर आजपासून बंदी घालण्यात आली आहे.
मा. उच्च न्यायालय मुंबई, खंडपीठ औरंगाबाद येथील जनहीत याचीका २०६७ पील नं. ४६ / २०२३ सरकार विरुध्द ज्ञानेश्वर बागुल व ईतर यांनी याचिका दाखल केली होती. त्यानुसार याचीका मध्ये मा.उच्च न्यायालय यांनी आदेश पारीत केले की, छत्रपती संभाजीनगर ते चाळीसगाव दरम्यान औट्रम घाटातील वन्यजिव प्राणी रक्षण व सतत होणारी वाहतुक कोंडी मुळे सामान्य नागरीकांना याचा नाहक त्रास होत असल्यामुळे औट्रम घाटातील जड वाहतुक ही बंद केली आहे. तसेच या बावत प्रभावी अंमलबजावणीचे आदेश पारीत केलेले आहेत.
जळगाव हद्दीतून सदर रस्ता व पर्यायी रस्ता जात असल्यामुळे जळगाव पोलीस दलाकडुन सदर रोडवर वाहतुकीस अडथळा होणार नाही. दोन्ही रोडने वाहतुक सुरळीत चालु राहील या करीता संभाव्य | अडचणीचा प्रत्यक्ष पाहणी करुन आढावा घेण्यात आला आहे. व मा. न्यायालयाचे आदेशावरुन खालील प्रमाणे उपाय योजना करण्यात आले असल्याचे प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे. यानुसार आता चाळीसगाव वाहतूक नियंत्रण शाखेचे सपोनि तुषार देवरे यांच्यासह सहकारी चोखपणे आपले कर्तव्य बजावत आहे. ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आले आहे. व कर्मचारी तैनात आहे.
पुर्वीचा जड वाहतुक मार्ग
चाळीसगाव ते कन्नड मार्गे संभाजीनगर जाणारी जड वाहतुक
ते
संभाजीनगर, कन्नड – चाळीसगाव कडे येणारी जड वाहतूक
बदल करण्यात आलेला जड वाहतुक मार्ग
चाळीसगाव, खडकी वायपास नांदगाव रोड, शिऊर बंगला मार्गे संभाजीनगर
संभाजीनगर, शिऊर वंगला मार्गे, नांदगाव रोड, खडकी वायपास चाळीसगाव