जळगाव, प्रतिनिधी । रोटरी क्लब ऑफ जळगाव मिड टाऊन यांच्यावतीने इंटरॅक्ट क्लबचे आयोजन केले गेले. यामध्ये ओरियन सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलचे विद्यार्थी देखील सहभागी आहेत.
सध्याच्या कोरोना सदृश्य महामारीच्या परिस्थितीत देखील विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक दातृत्व जागे राहावे, त्यांना आपल्या सामाजिक कर्तव्याची जाणीव व्हावी या हेतूने या क्लबचे कार्य चालू असते. यामध्ये विद्यार्थ्यांना काही उपक्रम दिले जातात जेणेकरून त्या उपक्रमाचा फायदा समाजातील इतर वर्गातील लोकांना देखील मिळतो. हे उपक्रम विद्यार्थ्यांना आहे त्या परिसरातच पूर्ण देखील करता येतात. ओरियन सीबीएससी इंग्लिश मीडियम स्कूलतर्फे नेहमीच असे समाज उपयोगी उपक्रम राबविले जातात आणि हा देखील त्याचाच एक भाग आहे जो इंटरॅक्ट क्लबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिला गेलेला आहे .
इंटरॅक्ट क्लबच्या माध्यमातून विद्यार्थी जे उपक्रम करतील ते व्यवस्थितरित्या पार पडावे यासाठी एक समिती नेमण्यात आली. ज्यामध्ये प्रेसिडेंट म्हणून पलक श्रीकांत दहाड तर व्हॉइस प्रेसिडेंट म्हणून चिन्मय ललित तावडे या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. त्याचबरोबर सेक्रेटरी म्हणून श्रावणी राजेश हरेल व जॉईंन्ट सेक्रेटरी म्हणून मेहुल पद्माकर पाटील या विद्यार्थ्यांची देखील निवड करण्यात आली.
याच अनुषंगानेच एका वेबिनारचे आयोजन दि ०८ रोजी करण्यात आले. यामध्ये हे सर्व विद्यार्थी या वेबिनारच्या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधला. या सर्व विद्यार्थ्यांना डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटेरियन शब्बीर शकीर यांचे मार्गदर्शन लाभले . या सर्व विद्यार्थ्यांचे ओरियन सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या सुषमा कंची व उपप्राचार्य माधवीलता सिट्रा यांनी कौतुक केले आहे तसेच इतर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या उपक्रमांच्या यशस्वीतेसाठी आपल्या शुभेच्छा दिलेल्या आहेत .