जळगाव प्रतिनिधी । के.सी.ई. सोसायटी संचलित ओरिऑन इंग्लिश मिडीयम स्टेट बोर्डची प्रथम परीक्षा ऑनलाइन 14 सप्टेंबर पासून सुरु होत आहे.
कोविड १९च्या परिस्थीतीला सामोरे जात असताना विद्यार्थ्याची शिक्षणाची गोडी व सातत्य रावावे याकरिता ऑनलाइन माध्यमातून शिक्षण उपलब्ध केले जात आहे. याचाच एक भाग म्हणून शाळेची इयत्ता 1 ली ते 10 वी ची प्रथम परीक्षा दि. 14 सप्टेंबर पासून सुरू होत आहे. या परीक्षेमध्ये पेपराचे स्वरूप सर्व प्रश्न बहुपर्यायी (Objective) प्रकारे असतील. प्रत्येक पेपर हा शिकविलेल्या अभ्यास क्रमावर आधारित ,प्रत्येक विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम, परीक्षेचे वेळापत्रक दिले जात आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला स्वता: चे गुण तत्काळ समजतील. ऑनलाईन शिक्षण देत असतांना सर्व विद्यार्थी व पालकांचा अती उत्तम प्रकारे प्रतिसाद मिळत आहे. विद्यार्थ्यांना भावी आयुष्यात परीक्षा ऑनलाईन द्याव्या लागणार आहेत. म्हणून इयत्ता 1ली पासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्याचा उपक्रम राबवण्यात येत आहे.तरी सर्व पालकांनी विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षेचा लाभ घेणास सहकार्य करावे जेणे करून कोणीही विद्यार्थी परिक्षेपासून वंचीत राहणार नाही.