ओढरे शिवारात चिमणी दिवसाचे औचित्यसाधून अनोखा उपक्रम !

 

चाळीसगाव, प्रतिनिधी । जागतिक चिमणी दिनाचे औचित्यसाधून ग्लोबल बंजारा अस्तित्व फाउंडेशनच्या वतीने आज तालुक्यातील ओढरे येथील शिंदी पाटणा रस्त्यालगत रान भोपळ्याचे वापर करून पक्षांना झाडावर पाणपोईच उपलब्ध करून दिल्याने या अनोख्या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

ग्लोबल बंजारा अस्तित्व फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अशोक राठोड यांनी जागतिक चिमणी दिवसाच्या निमित्ताने तालुक्यातील ओढरे शिवारात रान भोपळ्याचे वापर करून झाडांवर चिमणीला पाण्याची व्यवस्था केली. या अनोख्या उपक्रमाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.  सध्या उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. त्यात पाण्याची टंचाई जाणवू लागल्याने. पक्षांना पाण्याच्या अभावामुळे होत असलेली गैरसोय दूर करण्याच्या उद्देशाने व सामाजिक भान जोपासत ग्लोबल बंजारा अस्तित्व फाऊंडेशनने आज रान भोपळ्याचे वापर करून ठिकठिकाणच्या झाडांवर चिमण्यांना पाण्याची व्यवस्था करून दिली. यात सुकलेल्या रान भोपळ्याचा वापर करण्यापूर्वी त्यातील गर काढुन त्याचा वापर केला गेला. संस्थेने केलेल्या या वाखाणण्याजोगा कार्याबद्दल सर्वच कौतुक होत आहे. यावेळी शिवानंद राठोड, राहुल राठोड, आकाश राठोड व राकेश गवळी आदी उपस्थित होते. तसेच भावी पिढीत वन्य प्राण्यांविषयी सामाजिक भान जोपासावी या उद्देश्याने लहान मुलांनाही या उपक्रमात सहभागी करण्यात आले.

 

Protected Content