जळगाव-राहूल शिरसाळे । अधिसंख्य पदावर वर्ग केलेल्या व ३१ महिन्यांपासून पेन्शन नसलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी ऑर्गनाईझेशन फॉर राईट्स ऑफ ह्यूमन संघटनेच्या वतीने सोमवारी २६ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपेाषणाला सुरूवात करण्यात आली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की. अनुसूचित जमातीच्या कर्मचाऱ्यांचे अस्सल जात प्रमाणपत्र, वादग्रस्त जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने फसवणूक करून अवैध व जप्त केले आहे. न्यायालयाच्या दिलेल्या निकालाची अंमलबजावणी चुकीने पूर्वलक्षी प्रभावाने लागू करून शासनाचा निर्णय काढून १२ हजार ५०० स्थायी कर्मचाऱ्यांना ११ महिन्यासाठी अधिसंख्य पदावर वर्ग केले. मागील ३१ महिन्यात जवळपास १ हजार अधिसंख्य कर्मचारी सेवानिवृत्त झाले. परंतु त्यांना पेन्शन व इतर लाभ मिळाले नाही. त्यामुळे सेवानिवृत्ती कर्मचाऱ्यांना जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
सेवेत असलेल्या अधिसंख्य कर्मचाऱ्यांना वार्षिक वेतनवाढ व महागाईभत्ता देण्यात आलेला नाही. सरकारच्या काळात अधिसंख्य कर्मचाऱ्यांच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी संघटनेच्या वतीने यापूर्वी आझाद मैदानावर ६७ दिवसांचे साखळी उपोषण केले होते. तरी देखील प्रलंबित प्रश्न अद्यापपर्यंत सोडवलेला नाही. त्यामुळे सोमवार २६ सप्टेंबर पासून ऑर्गनायझेशन फॉर राइट्स ऑफ ह्यूमन संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर न्याय मिळेपर्यंत राज्यव्यापी आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे.
याप्रसंगी लीलाधर ठाकूर, चंद्रशेखर ठाकूर, सुरेश नन्नवरे, पंडित सोनवणे, विष्णू ठाकरे, गोविंदा ठाकरे, दिलीप सोनवणे, स्पर्श तायडे यांच्यासह आदींनी आमरण उपोषणात सहभाग नोंदविला आहे. https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/422798396652556