ऑर्किड शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून प्रदर्शनाचे आयोजन

 

चोपडा, प्रतिनिधी । येथील यशोधन चॅरिटेबल ट्रस्ट संचालित ऑर्किड इंटरनॅशनल स्कूल चोपडा मध्ये आज राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून शाळेत विद्यार्थ्यांसाठी विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले होते.

राष्ट्रीय विज्ञान दिना निमित्त आयोजित विज्ञान प्रदर्शनचे प्रमुख पाहुणे म्हणून यशोधन चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. राहुल पाटील, कांतीलाल पाटील सरपंच अजेंतेसीम तसेच आत्माराम निकीम,शाळेच्या प्राचार्या मिस परमेश्वरी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते सी व्ही रमण व भारताचे माजी राष्ट्रपती तसेच महान वैज्ञानिक डॉ. ए. पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी कांतीलाल पाटील यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी जीवनातील वैज्ञानिक दृष्टीसाठी मार्गदर्शन केले. तसेच संस्थेचे अध्यक्ष डॉ. राहुल पाटील यांनी विद्यार्थ्यांना डॉ. अब्दुल कलाम यांनी केलेल्या कार्याला सलाम करत विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात सदैव चिकित्सक भाव ठेवावा कारण प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये एक शास्त्रज्ञ दडलेला असतो असे विचार मांडून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. लिपिका नागदेव यांनी विज्ञान दिनाचे महत्व सांगितले,यावेळी पालक वर्गातून यशवंत पाटील, विश्वेश्वर जाधव, पंकज पाटील, विनोद पाखले, सिद्धार्थ वाघमारे, भाऊसाहेब पवार, बळीराम पावरा, देवानंद पाटील, संदीप तायडे, वानसिंग बारेला, चेतन कुमार जैन, दिनेश नाथबुवा, कासीम कच्छी, भिकन पाटील, रमेश पाटील, मनीषा पाटील, कविता पाटील, ज्योती सननसे, फरीना शाहिद, डॉ. अर्चना पाटील, स्नेहल चौधरी, आरती पखाले, पूजा जैन, हेमलता आसोडेकर, अनिता पवार, वंदना वाघमारे, माधुरी पाटील, अंकिता जैन आदी उपस्थित होते. यावेळी सर्व उपस्थित मान्यवरांनी तसेच पालकांनी विद्यार्थ्यांनी बनविलेले विज्ञान प्रदर्शनातील मॉडेल्स बघितले. यात ज्यूनियर केजीच्या विद्यार्थ्यांनी विरुद्धार्थी शब्द, वाहतुकीचे नियम दर्शवणारा लाईट, संख्या चक्र, तर सिनियर केजीच्या वर्गातून प्रीपोझिशन, बलून बोट, पहिलीच्या वर्गातून सेंटेन्स फॉर्मेशन, प्रोनऊन, सिम्पल प्रेसेंट टेंस, दुसरीच्या वर्गातून सोलर सिस्टम, वॉटर सायकल,रिस्पेरेटरी सिस्टम, हार्ट वर्किंग मॉडेल, करन्सी कलेक्शन, डिव्हिजन मशीन, मेझरमेन्ट यासारखे प्रोजेक्ट मॉडेल मांडण्यात आले होते, यावेळी मान्यवरांनी तसेच पालकांनी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारले त्यांना विद्यार्थ्यांनी योग्य असे उत्तर दिले.यात वैष्णवी जाधव हिला तिच्या किडनी वर्किंग मॉडेल साठी प्रथम क्रमांक देण्यात आला. तर आर्या आणि चेतना यांना त्यांच्या डिव्हिजन मशीन या गणिताच्या मॉडेल साठी द्वितीय क्रमांक देण्यात आला. सिनियर केजीच्या विद्यार्थ्यांना त्यांनी बनविलेल्या बलून बोट या मॉडेलसाठी तृतीय क्रमांक देण्यात आला.यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितेश वाघ यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Protected Content