ऑनलाईन महासभेचा फज्जा; तांत्रीक अडचणींमुळे सदस्य संतापले (व्हिडिओ)

 

 

जळगाव राहूल शिरसाळे । आज आयोजित करण्यात आलेल्या महापालिकेच्या ऑनलाईन महासभेचा ढिसाळ नियोजनामुळे फज्जा उडाल्याचे दिसून आले. खरं तर आता अनेक महापालिकांमध्ये ऑफलाईन महासभा होत असतांना ऑनलाईनचा आग्रह का ? असा प्रश्‍न शिवसेनेच्या सदस्यांनी उपस्थित केला. तर ऑनलाईन सभा सुरू झाल्यानंतर अनेक सदस्यांचे माईक सुरू असल्याने सभेत नेमके काय चालले ते इतरांना कळेनासे झाले. परिणामी ढिसाळ नियोजनामुळे सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.

राज्यातील इतर महापालिकांमध्ये ऑफलाईन सभा सुरु झालेल्या असतांना जळगाव महापालिकेत ऑनलाईन सभा घेतली जात असून यात होणारी चर्चा समजत नसल्याचा आरोप करत विरोधकांनी थेट सभागृहात प्रवेश करून प्रशासनच्या ढिसाळ कारभाराचा निषेध केला. विरोधकांनी आपण सभागृहातच थांबून कामकाजात सहभागी होऊ असा पवित्रा घेत सभागृहात स्थानपन्न होत सभेत सहभाग नोंदविला.

महापालिकेची ऑनलाईन सभा महापौर सौ. भारती सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली मनपाच्या प्रशासकीय इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर सुरु असतांना ऑनलाईन सभेतील विषय व्यवस्थितपणे समजत नाही. सत्ताधारी केवळ त्यांचे विषय घेत आहेत असा शिवसेनेचे विरोधीपक्ष नेते सुनील महाजन यांनी आरोप करत सभागृहात प्रवेश केला. त्यांच्या सोबत शिवसेनेचे गटनेते बंटी जोशी, नगरसेवक इबा पटेल, गणेश सोनवणे, प्रशांत नाईक यांनी देखील प्रवेश केला. त्यांनी आपल्या हातातील मोबाईल महापौर सौ. भारती सोनवणे व आयुक्त सतीश कुलकर्णी यांना दाखवत सभेत काय होत आहे हे काहीच कळत नसल्याची तक्रार केली.

याच वेळी सत्ताधारी गटाच्या नगरसेवकांनी देखील सभागृहात प्रवेश केला. यात नगरसेवक कैलाश सोनवणे, सचिन पाटील, चेतन सनकत, कुलभूषण पाटील, किशोर बाविस्कर आदींचा  समवेश होता. नगरसेवक कैलास सोनवणे यांनी देखील ऑफलाईन सभेबाबत महापौर व आयुक्त यांच्यासोबत चर्चा केली असता ऑफलाईन सभेबाबत वारंवार शासनाकडे पत्राद्वारे पाठपुरावा करण्यात आला आहे, मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑफलाईन सभेची परवानगी देण्यात आलेली नसल्याचे आयुक्त कुलकर्णी यांनी स्पष्ट केले. आयुक्तांनी समजूत घालून देखील शिवसेनेच्या नगरसेवकांनी सभागृहात थांबून सभेत प्रत्यक्ष सहभाग घेतला तर भाजपचे नगरसेवकांनी ऑफलाईन सभेत सहभाग घेतला.

https://www.facebook.com/508992935887325/videos/863255667843889

Protected Content