ऐतीहासीक निकालाबद्दल उपनिबंधक बिडवई यांचा सहकार मंत्र्यांच्या हस्ते सत्कार !

 

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | सावकारी पाशातून शेतकर्‍यांची जमीन त्यांना परत देण्याचा ऐतीहासीक निर्णय देणारे जळगावचे उपनिबंधक संतोष बिडवई यांचा आज मंत्रालयात सहकार मंत्री ना. अतुल सावे यांना सत्कार केला.

या संदर्भातील वृत्त असे की, जळगावचे उपनिबंधक संतोष बिडवई यांनी काल एक महत्वाचा निकाल दिला आहे. रावेर आणि यावल तालुक्यातील नंदकुमार मुकुंदा पाटील, मुरलीधर सुदाम राणे, मुरलीधर तोताराम भोळे, मधुकर तुकाराम राणे, मुरलीधर काशिनाथ राणे, सुदाम तुकाराम राणे, श्रीधर गोपाळ पाटील, मधुकर वामन चौधरी या सावकारांनी बेकायदा पध्दतीत मालमत्ता हडप केली होती. या संदर्भात जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. यात तब्बल ४७ सुनावण्या झाल्या. यानंतर जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई यांनी १५ शेतकर्‍यांच्या हडप केलेल्या तब्बल ९६ एकर जमीन परत करण्याचे निर्देश दिलेत.

जळगाव जिल्हा उपनिबंधकांनी केलेली ही कारवाई राज्यातील सर्वात मोठी मानली जात आहे. त्यांच्या या कारवाईचे सहकारमंत्री ना. अतुल सावे यांनी सन्मानपत्र देऊन सत्कार केला. आज मंत्रालयात त्यांचा सत्कार करण्यात आला.

Protected Content